shree devi hedubai mandir khudi - 2021 akhand harinam saptah
Varshik akhand harinam saptah देवगड तालुक्यातल्या खुडी गावात असलेल्या श्री देवी हेदुबाई मंदिरात 30 ते 06 नोव्हेंबर दरम्यान सात पाराचा सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.
खुडी हे गाव मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली पासून सुमारे 35 कि. मी. तर देवगडपासून 32 कि. मी. अंतरावर असून कोटकामते पासून फक्त 6 कि. मी. अंतरावर आहे. देवी हेदुबाई या नावाने दुसरं कुठल देऊळ नाही. या साठी खुडी गाव प्रसिद्ध आहे.
निसर्गाने नाटलेल्या या गावाला उच्च संस्कृतीचे वरदान लाभलेले एक ग्रामीण संस्कृती केंद्र असून त्याला सामाजिक,सांस्कृतिक व कलात्मक परंपरा लाभलेली आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बुधवळे गाव असून , उत्तरेला पर्यटन क्षेत्र असलेले उंचावरील श्री आई भगवती कोटकमते प्रेक्षणीय मंदिर, या मंदिराजवळच श्री पावणाई , देवीचे मंदिर. हे मंदिर सुमारे २६५ वर्षापुर्वी सेनासरखेल कान्होजी आंग्रे यांनी या देवळाचे बांधकाम केले आहे.
अशा या प्रवित्र भूमीत श्री देवी हेदुबाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षी उत्पती एकादशी मंगळवारी दि. 30 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ मृदंगाच्या नादात सकाळी 10 वाजता साप्ताहाची स्थापना केली जाते. मंदिराच्या सभा मंडपात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची स्थापना होते. भट वहिवाटदार यांच्या साहाय्याने श्रीं विठ्ठल रखुमाई ची पूजा करून घट बसवतात. वहीवाटदार गावकरी देवतांना श्रीफळे अर्पण करून गाऱ्हाणे घातले जाते. अश्या रीतीने हरीनाम साप्ताहास सुरुवात होते.
Khudi devgad
या हरीनाम सप्ताह मुळे खुडी गावात पंढरपूरच वातावरण असतं. या साप्ताहास मुंबई तसेच ठीक ठिकाणी कामाला असलेले चाकरमानी मोठया संख्येने गावी येतात.अश्या सर्वांच्या एकोप्यातून हरीनामाचा आनंद दुगुणी होतो. कोकणच्या कानकोपऱ्यातून दरदिवशी हजारो लोक हरीनाम साप्ताहास उपस्तित राहून श्री देवी हेदुबाई चे दर्शन घेतात.नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी हेदुबाईच्या दर्शनासाठी तसेच ओटी भरण्यासाठी माहेरवसनींची सुहासिनीची गर्दी पाहायला मिळते. गोसावी तसेच इतर गावातील गावकरी, गावातील लोक, महिला बचत गट, आपली चहा नाष्टा खाजाची दुकाने अशी अनेक दुकाने परिसरात लावतात.
Hedubai temple
त्यानंतर सायंकाळी 7 वाजता सर्व गावकरी भक्तजण मिळून टाळ, मूदूंग, ठोल घेऊन श्री विठ्ठल रखुमाई ची आरती करता. या साप्ताहास गावों गावचे भजन मेळ, लोकनूत्य, दिंडया, भजनी बुवांची भजने, स्थानिक भजने गावातील तसेच कोकणातील वारकरी सहभागी होतात. अश्या विविध कार्यक्रमाणी प्रत्येक रात्र रहस्यमय ठरते.
या साप्ताहासाठी देवालय संचालक मंडळ वहीवाट याने मंदिराचे तसेच परिसराचं सुशोबी करण केले आहे. विदयुत रोशनाई ने मंदिर परिसर झलकावून निघाला आहे.
Akhand harinam saptah 2021
Dev deepawali
देव दीपावली दिवशी गावात देवीचा दिवा फिरवला जातो. या दिवशी रात्री नवस फेडण्यासाठी देवालयात गर्दी जमते. फटाक्याच्या आवाजात मंदिर डुगमूंगून जाते.
सातव्या दिवशी सकाळी 4 वाजता काकडी आरती केली जाते. या नंतर 11 वाजता दहीहंडी फोडून हरीनाम साप्ताहाची सांगता होते. घटविसर्जन झाल्यानंतर दुपारी 1 वाजता महाभोजनाच्या कार्यक्रमाने उत्सव सोहोळ्याची सांगता होते. दुपारी सर्व गावासाठी महाप्रसादाची सोय केलेली असते.
Harinam saptah
तरी आपण या हरीनाम सप्ताहचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री हेदुबाई देवस्थान मंडळ खुडी आणि खुडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आपले नम्र
श्री देवी हेदुबाई देवस्थान मंडळ, खुडी
Shree devi hedubai devsatan khudi
Akhand harinam saptah
उत्तर द्याहटवा