○
समुद्रा सपाटी पासुन सह्याद्री पर्वता पर्यत पसरलेल्या या पावन भूमीला आपण कोंकण Konkan असे संबोधतो.येथे आडळणाऱ्या राणमेव्यातला हा सर्वात मोठया प्रमाणात आडळतो.कोकणातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कोंकणी मेवा. konkani meva त्यातील एक म्हणजे कोकण काजू kankan cashew .आपण सर्वांनी काजू तर पहिलेच असाल. चला तर आपण काजूच्या लागवडी पासून विक्री पर्यंतिची संपून माहिती
1. कोकणात कोणकोणत्या काजू लागवडीस उपयुक्त ठरतात
ब्राझील काजू / गावठी काजू
वेंगुर्ला 4
वेंगुर्ला 7
वेंगुर्ला 8
वेंगुर्ला 2
• काजू रोप कुठे मिळतील
वेंगुर्ला 7 हे आपणास वेंगुर्ला तालुका येते सहज उपलब्ध होतील. एक वर्षाची रोप साधारण पणे 80 - 100 किमतीत मिळतील. 2 वर्षाची रोप 110 - 120 रुपयांस मिळतात. प्रत्येक नर्सरी चा दर वेगवेगळा असू शकतो.
ब्राझील रोप भारतात सर्वत्र नर्सरी मध्ये मिळू शकते.अथवा आपण स्वतः घरी बनवू शकतो.
2. लागवड कशी करावी
डोंगरमात्या वरील खडकर भागात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते. त्याचप्रमाणे माळ राणावर काजूस उत्तम जागा ठरेल. सर्वात प्रथम आपणास मार्च ते एप्रिल या महिन्यात खडे करून ठेवणे महत्वाचे असते. कारण उन्हाळ्यात तापमान जमिनीत बॅक्टएरियाचा नाश होतो. रोप निरोगी राहतात.खड्डे 2 फूट खोल व 2 फुट रुंद असावेत. तसेच त्या मधील अंतर 7 ×10 एवढे असणे आवश्यक आहे. गावठी काजूस हे अंतर 15×15 ठेववं. काजू ची 1 वर्षाची रोप निवडावी. सर्व साधारण 2 फूट उंची असावी.
जुनंच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात झाली की काजू लागवड सुरुवात करावी.
सर्व प्रथम खड्यात शेण खत, गांडूळ खत, पालापाचोळा या पैकी आपल्याकडे कोणते उपलब्ध असेल ते 1 किलो एवढे द्यावे. रोप लागवड करावी. आधारासाठी अडीच ते तीन फिट उंचीची काटी लागावी. जेणे करून सरळ दिशेने वाढतील वाऱ्यामुळे वाकणार नाहीत. वेंगुर्ला 4 ह्याची ओळख म्हणजे पाने आकाराने लहान असतात. बोन्ड चा रंग लाल असतो. काजू गर आकाराने लहान असतो.काजू गराच्या वरील जो भाग असतो त्याला कोकणी भाषेत बोन्ड असे म्हणतात. वेंगुर्ला 7 च्या पानांचा आकार वेंगुर्ला 4 पानांच्या आकारा पेक्षा मोठा असून बोन्ड पिवळ्या रंगाचे असते.काजू गर आकाराने मोठा असतो.
3. रोपांची काळजी कशी द्यावी
लागवड करून 15 दिवसा नंतर सेंद्रिय किंवा रासायनिक खतांचा ठोस देणे गरजेचे असते. रासायनिक मध्ये युरिया, मिश्र खत. ऑक्टोबर महिन्या पर्यंत 6 ते 7 ठोस देणे आवश्यक आहे.
रोपांच्या मुळा पासून 5 इंच लांब गोल 2, 4 खानून त्यात खत टाकावे.
श्रावण महिन्यात लॅम्डा-cyhalothrin 2.5% EC या कीटक नाशकाची फवारणी करावी.
ऑक्टोबर - मे पर्यंत दर 8 दिवसांनी प्रत्येक रोपांस किमान 5 लिटर पाणी द्यावे.
दुसऱ्या वर्षी जुलै च्या दरम्यान अर्धा किलो रासायनिक किंवा सेंद्रिय खत प्रत्येक रोपास द्यावे. पाऊस संपून हिवाळा ऋतू सुरु होतो. या महिन्यात काजुला पालवी येते. त्यातूनच मोहोर यायला चालू होते. ह्या काळात सर्वात जास्त काळजी मोहोराची द्यावी लागणार.
4. कीटकनाशक कोणती वापरावी
काजुसाठी आपल्याला 3 फवारणी करावी लागतात. पालवी यायला सुरुवात झाली की पहिली फवारणी लॅम्डा-cyhalothrin 2.5% EC ची करावी. 1लिटर पाण्यात 1 मिली एवढे प्रमाण ठेवावे. यामुळे पालवीला लागणारे किडे मरून पालवी टवटवीत राहते. जेणे करून मोहोर लवकर येतो. दुसरी फवारणी सायपरमेथरीन cypermitrin. 1लिटर पाण्यात 1 मिली. हि फवारणी मोहोर आला की करावी. तिसरी फवारणी लॅम्डा-cyhalothrin 2.5% EC 1 लिटर पाण्यात अर्धा मिली.काजू लागायला सुरुवात झाली की करावी. यामुळे काजूला बुरशी लागत नाही
काजू म्हणजे नेमक काय?
ब्राझीलच्या जंगलात सर्व प्रथम हि प्रजाती आडळली . ब्राझील मधूनच सर्वत्र पसारायला लागली. भारता मध्ये मोठया प्रमाणात लागवड करायला ह्यायला सुरुवात झाली. कोकणातील जमीन खडतर तसेच माळरान असल्याने येथे फार मोठया प्रमाणात आपण पाहू शकतो.
काजूचे खोड गडत रंगाचे असून त्याचा व्यास 2 - 3 फूट असू शकते. पानांचा रंग हिरवा असून देठा पासून पाण्याच्या शेवट पर्यंत मधून सफेद रंगाची रेषा असते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्या दरम्यान मोहोरायला सुरुवात होते. मोहोरा पासुन काजू cashew लागायला सुरुवात होते. सर्व साधारण पणे काजू गराचे वजन 5 ग्रॅम पर्यंत असते.
• काजू गर किंमत | kashew nuts price
काजू गर ची किंमत त्याच्या दर्जा नुसार ठेवली जाते. त्याच प्रमाणे काजू पीक हंगाम नुसार सुद्धा ठरवली जाते.सध्या तरी काजू गर 1किलो 1200. त्याच प्रमाणे हिरवे काजू गर 1300 किलो.
काजू बी -120 किलो, वेंगुर्ला 7 -150किलो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा